उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 17 रोजी रत्नागिरी दौरा
मार्च १६, २०२५
0
शहरात स्व. रतन टाटा यांनी सीएसआरमधून मंजूर केलेल्या कौशल्य विकास केंद्राचे भूमीपूजन, थिबा पॅलेस येथील थ्रीडी मल्टीमिडिया शोचा शुभारंभ आणि भगवती बंदर येथील शिवसृष्टी टप्पा-2 चा शुभारंभ 17 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्व. रतन टाटा यांनी सीएसआरमधून रत्नागिरी जिह्यासाठी कौशल्य विकास केंद्र मंजूर केले होते. रत्नागिरीतील उद्यमनगर चंपक मैदान येथे या केंद्राची उभारणी होणार असून 17 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता या केंद्राचे भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. ाढाwशल्य विकास केंद्राच्या भूमीपूजन सोहळ्याला जिह्यातील अभियांत्रिकी क्षेत्रातील सुमारे अडीच हजार विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 8.15 वाजता थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टीमिडिया शोचा तर रात्री 9 वाजता भगवती बंदर येथील शिवसृष्टी टप्पा-2 कामाचा पवार यांच्या हस्ते शुभारंभ होईल. याच दिवशी तिथीप्रमाणे शिवजयंती आहे. शिवसेनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या स्वरुपात जल्लोषात साजरी केली जाणार आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा