ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी!
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही संकटात तातडीने मदत मिळावी, त्यांच्या तक्रारी आणि अडचणींचे निवारण व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दलाने 8390929100 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर व्हॉट्सॲप सुविधाही उपलब्ध आहे.
आजकाल अनेक घरांतील तरुण मंडळी नोकरी-व्यवसायासाठी मुंबई किंवा इतर शहरांमध्ये स्थायिक झालेली असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक घरी एकटेच राहतात. निराधार ज्येष्ठ नागरिकांची स्थिती तर अधिकच बिकट असते. अशा परिस्थितीत त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन पोलिसांनी ही हेल्पलाइन सुरू केली आहे.
या हेल्पलाइनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक खालील मदत मिळवू शकतात:
- कोणत्याही संकटात तातडीने मदत
- तक्रारी आणि अडचणींचे निवारण
- पोलिसांकडून मार्गदर्शन