फॅशन शोमध्ये निसर्गाचे दर्शन; डिझायनर्सनी वेधले प्रेक्षकांचे लक्ष

राजेश पालशेतकर
0

 

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे मोठ्या उत्साहात पार पडले. यानिमित्त पुण्याच्या मणिलाल नानावटी व्होकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या फॅशन डिझायनिंग विभागाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या फॅशन शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जयेश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत झाला. सात संकल्पनांवर वेगवेगळ्या कपड्यांमध्ये विद्यार्थिनींनी शो सादर केला. प्रथमच रेझिन आर्ट तंत्राचा वापर करून कापडावर नवनवीन नमुने साकारले. ब्रूचेस बाय द ब्रूक,  स्कायबॉन्ड रिव्हायव्हल,  ब्लॉसमिंग ग्रेस, फ्रोझन एलेगन्स,  विंग्स ऑफ ग्लॅमर   अॅक्वा अरोरा आणि या थिमवर आधारित फॅशन शो सादर झाला.

ब्रूचेस बाय द ब्रूक या कलेक्शनमध्ये किंगफिशर बर्डपासून प्रेरणा घेऊन, बर्डमधल्या चमकदार रंगाचा वापर केला. रेडियन्ट ब्लू, फायरी ऑरेंज आणि काम पीच कलरचा वापर केला. हे कलेक्शन रिसॉर्ट वेअर या कॅटेगरीमध्ये येते. ए लाईन सीलूएट्स, नैसर्गिक फॅब्रिक्सचा वापर करून कपड्याना लक्झरीअस आणि ग्लॅमरस लुक देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी सुंदरता वाढवण्यासाठी मोती व एम्ब्रॉडरीच्या धाग्यांनी सुशोभित केले.

स्कायबॉन्ड रिव्हायव्हल हे कलेक्शन पुनर्वापर किंवा सस्टनेबिलिटी यावर आधारित होते. यात वापरलेल्या डेनिमस व लेस कापडाचा वापर केला होता. त्या गारमेंट्सचा लुक वाढवण्यासाठी त्यामध्ये फॅब्रिक पेंटिंग, फ्रेंच नॉट एम्ब्रॉयडरी आणि मोत्यांचा वापर केला. शैली आणि सर्जनशीलतेचे मिश्रण यात पाहायला मिळाले.

ब्लॉसमिंग ग्रेस या कलेक्शनची प्रेरणा हे लिली फुल होते. जे शुद्धता आणि सुसंस्कृतता दर्शवते. कार्यालयीन पोशाखासाठी याचा उपयोग केला जातो. ओम्ब्रे डायिंग, फॅब्रिक पेंटिंग व रिबन वर्क एम्ब्रॉयडरीचा वापर यात केला. त्याचबरोबर त्याची सुंदरता वाढवण्यासाठी नाजूक मोती व पाईप्स म्हणजेच कटदाण्याचा वापर केला होता. गारमेंट्सचा लुक पूर्ण करण्यासाठी त्यांनी केप्स चा वापर केला जो महिला सक्षमीकरण दर्शवते.

फॅशन शोमध्ये स्नेहा धावडे, तृप्ती खोपडे, योगिता विटकर, गौरी मोरे, हिमाली मैंद, दिव्या साळवी, सायली हागरे, अपूर्वा बुडगे, अंजली भुतकर, साक्षी मोहोळ, अक्षता गोने, साक्षी शेळके, शिल्पा वायकर, प्राप्ती गायकवाड, पायल सदाफुले, वैष्णवी बराटे, प्राजक्ता पवार, सिद्धी पळसकर, साक्षी निगुसकर, दिव्या राजपूत, नमो रांका, प्राजक्ता जोरी, श्रुती पवार, ऐश्वर्या शिरीष सुर्यवंशी, सायली चव्हाण, निकिता दोरगे, तृप्ती ढोबळे आणि अमृता धुमाळ यांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top