"गायींना न्याय मिळावा आणि अन्य मागण्यांसाठी लोटे येथील गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे उपोषणावर"
लोटे येथील गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे हे गेल्या चार दिवसांपासून गायींना न्याय मिळावा, तसेच विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. गुरुवारी त्यांची प्रकृती गंभीर खालावल्याचे दिसून आली, त्यामुळे लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी त्यांची सातत्याने तपासणी करत आहेत. तरीही, कोकरे यांनी ठामपणे सांगितले की, शासनाकडून ठोस कार्यवाही होईपर्यंत ते आपले उपोषण मागे घेणार नाहीत.
उपोषणाला विविध संघटनांनासह महाराष्ट राज्य वारकरी सांप्रदाय संघटनेने पाठिंबा दिला आहे. उपोषणामुळे गोशाळेतील देशी गायींच्या पालनासाठी शासनाने दोन दिवसांपूर्वी ३३ लाख ४८ हजार रुपये अनुदान दिले आहे. तथापि, अन्य मागण्यांसाठी कोकरे यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.