लांजा तालुक्यातील पालू येथील एक ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या पायांना दारुच्या नशेत बळजबरीने मॉलिश करून दुखापत केल्याच्या घटनेत लांजा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी सायं ८ वाजेच्या सुमारास सरिता नारायण राणे (७०) आपल्या घरात बसलेल्या होत्या. त्याच वेळी त्यांच्या घरात राहणारा अशोक महादेव चव्हाण (५५) हा दारुच्या नशेत त्यांच्याकडे आला. त्याने सरिता राणे यांना सांगितले की, "मी तुमच्या पायाला मॉलिश करून देतो," पण सरिता राणे यांनी त्यास नकार दिला. तरीही अशोक चव्हाण याने बळजबरीने त्यांच्या पायांना मॉलिश केली आणि त्यामध्ये त्यांना दुखापत झाली. या घटनेनंतर सरिता राणे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी अशोक महादेव चव्हाण याच्यावर भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम १२५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ह्या प्रकरणाचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव करत आहेत.